spot_img
Home Akola-mr Akola : ट्रेनमधून महिला कोसळली; आरपीएफ जवानाने वाचविले प्राण

Akola : ट्रेनमधून महिला कोसळली; आरपीएफ जवानाने वाचविले प्राण

0
234

Indiagroundreport वार्ताहर
अकोला : धावती ट्रेन पकडण्याच्या नादात एक महिला रेल्वेखाली जाता जाता वाचली. आरपीएफ जवानाच्या(RPF jawan) प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला.

भारतीय रेल्वेकडून धावती ट्रेन(Train) पकडू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, तरीदेखील अनेकजण धावती ट्रेन पकडतात. यात तोल गेल्यावर आपल्या जिवाचे काही बरे-वाईट होऊ शकते असा कोणताही विचार न करता धावती ट्रेन पकडतात. आतापर्यंत यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.

अकोला(Akola) येथे एक महिला रेल्वे अपघातात थोडक्यात बचावली. महिला काचीगूडा एक्सप्रेस पकडत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. महिला रेल्वेखाली जाण्याची भीती होती. मात्र, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफ जवानाने धावून जात तिचा जीव वाचविला.

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बी. आर. धुर्वे(B. R. Dhurve) असे महिलेचा जीव वाचविलेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, नेटकरी आरपीएफ जवानाने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक करीत आहेत.