spot_img

Thane : कळव्यात दोन गटात राडा

कळवा रुग्णालयातही पुन्हा झाली तुंबळ हाणामारी

समर प्रताप सिंग
ठाणे : जमिनीच्या वादातून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या वादाला शनिवारी दुपारी तोंड फुटले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तकी चौलकर आणि खानबंदे गटामध्ये हाणामारीची घटना घडली. जखमींवर उपचारासाठी कळवा रुग्णालयात(Kalwa Hospital) नेण्यात आल्यानंतर उपचारासाठी आलेल्या दोन्ही गटात कळवा रुग्णालयाच्या आतमध्ये हाणामारीचे पुन्हा धुमशान झाले. याप्रकरणी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले.

अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या जमिनीवरून तकी चौलकर आणि खानबंदे गट शनिवारी दुपारी आमने-सामने आले. कालवा परिसरात या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात तकी चोळकर आणि खानबंदे गटाचे काही लोक जखमी झाले. जखमींना कालव्याच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. चौलकर गट हा प्रथम कळवा रुग्णालयात पोहचला. कळवा रुग्णालयात चौलकर समर्थक आणि नातेवाईक हे रुग्णालयात पोहचले. त्याचवेळी दुपारी २:३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास विरोधी गट खानबंदे हे देखील कळवा रुग्णालयात पोहचले. कळवा रुग्णालयात या दोन्ही गटांमध्ये पुन्हा तुंबळ मारामारी(fight) झाली.

कळवा रुग्णालयात एकच खळबळ

दोन्ही गटाचे नातेवाईक आणि समर्थक कळवा रुग्णालयात जमल्यानंतर अचानक कळवा रुग्णालयात हाणामारीची घटना घडल्याने रुग्णालयातील उपचारासाठी आलेल्या रुग्णांची धांदल उडाली. अचानक कळवा रुग्णालयाच्या तळमजल्यावर हाणामारी सुरु झाल्याने अनेकजणांना प्रसाद खावा लागला. उपचारासाठी किंवा रुग्णांना(patients) भेटण्यासाठी आलेल्या लोकांनाही या हाणामारीचा फटका बसल्याची सूत्रांची आणि प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.

कळवा पोलीस धडकले; काहींना घेतले ताब्यात

कळवा रुग्णालयात झालेल्या तुंबळ हाणामारीची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलीस(police) घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच जमावाला पांगविण्यासाठी बघ्यांना आणि दोन्ही गटाच्या समर्थकांना प्रसाद दिला. कळवा रुग्णालयात हाणामारी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, कळवा पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. त्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार, कळवा पोलिसांनी संध्याकाळपर्यंत दोन्ही गटातील १० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही गटावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

New Delhi : युवा कार्तिक की तारीफ में गायकवाड़ बोले- उसमें हर परिस्थिति में ढलने की है काबिलियत

नई दिल्ली : (New Delhi) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) के कप्तान रुतुराज गायकवाड़ (Chennai Super Kings (CSK) captain Ruturaj Gaikwad) ने युवा खिलाड़ी कार्तिक...

Explore our articles