spot_img
Home Uncategorized Navi Mumbai : कोकण भवन येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

Navi Mumbai : कोकण भवन येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

0
447

समर प्रताप सिंग
नवी मुंबई : संविधान जागरूकता मोहिमेअंतर्गत आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त कोकण भावनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे(Vandana Kochure) यांनी प्रास्ताविकेचे वाचन करून ‘संविधान दिन’ साजरा केला.

यावेळी सहाय्यक आयुक्त(प्रशासन) मनीषा देवगुणे, प्रभारी तहसीलदार(सामान्य प्रशासन) माधुरी डोंगरे, सोनवणे(सहाय्यक संचालक अन्न व नागरीपुरवठा, मंत्रालय), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक धर्मराज गोसावी, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, विनोद जामनेर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) व संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रस्ताविकेचे वाचन केले.

संविधानाबाबत(the Constitution) जनजागृती व्हावी या उद्देशाने 26 नोव्हेंबर रोजी “जागरूकता मोहीम” राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत 26 नोव्हेंबर दिनी प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. तसेच, या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत “समता पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रभातफेरी, संविधान वाचन, व्याख्याने, जाती प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी इत्यादीसाठी विविध कार्यक्रम, निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभाग मुंबईच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.