spot_img
Home Uncategorized Pune : मनसेत अंतर्गत वाद?; वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा

Pune : मनसेत अंतर्गत वाद?; वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा

0
252
Pune : Dispute within MNS?; Talk about Vasant More being upset again

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune)
मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे वसंत मोरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहेत, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे. मनसेचा आज मुंबईत मेळावादेखील पार पडत आहे, मात्र एकीकडे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम राज ठाकरे करीत असताना पुण्यात मात्र वेगळं चित्र आहे.

पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरे(Vasant More) यांना बोलू दिलं नसल्याची चर्चा आहे. याबाबत वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षकाची जबाबदारी कायम आहे. मात्र, काम पुणे कार्यक्षेत्रात करा, असा आदेश दिल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत आहेत, हे देखील वसंत मोरेंच्या नाराजीचं कारण आहे. पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे असा वाद सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या या अंतर्गत वादावर राज ठाकरे किंवा इतर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

मी नाराज नाही, तर माझे कार्यकर्ते नाराज आहेत. मेळाव्याला मला बोलवलं, मात्र बोलू दिले नाही. त्यामुळे कार्यक्रम(program) संपल्यानंतर कार्यकर्ते मला विचारत होते, तुम्ही का बोलले नाही. मी त्यांना सांगितले की, मला माहिती नाही वरिष्ठांना विचारा. अशावेळी विचारतात की सर्व सभा संपायला आली. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, असे कार्यकर्ते म्हणत होते. हीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातील मेळाव्यात झाली होती, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावीत, असं का होतं?.