spot_img
Home business-mr Mumbai : सेंट्रल रेल्वेचा आर्थिक वर्ष 2022-23(एप्रिल-ऑक्टोबर) मधील ₹ 250.49 कोटींचा भंगार...

Mumbai : सेंट्रल रेल्वेचा आर्थिक वर्ष 2022-23(एप्रिल-ऑक्टोबर) मधील ₹ 250.49 कोटींचा भंगार महसूल हा आतापर्यंतचा सर्वाधिक

0
383
Mumbai: Central Railway's gross revenue of ₹ 250.49 crore in the financial year 2022-23 (April-October) is the highest ever

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
सेंट्रल रेल्वेने(Central Railway) सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

चालू आर्थिक वर्ष २०२२ – २३(एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान, सेंट्रल रेल्वेने भंगार विक्रीतून ₹ २५०.४९ कोटी मिळविले. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सेंट्रल रेल्वेला प्राप्त झालेल्या रु. २४८.६७ कोटींच्या महसुलाच्या तुलनेत ₹ १.८२ कोटी अधिक आहेत.

भंगार विक्रीतून(sale of scrap) सेंट्रल रेल्वेने ₹ २५०.४९ कोटींचे महसूल प्राप्त केले आहे. कोणत्याही वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.

याबाबत सेंट्रल रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी(Anil Kumar Lahoti) म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळते असे नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत होत आहे. सेंट्रल रेल्वे मिशन मोडमध्ये निवडलेल्या सर्व भंगार साहित्याची रेल्वेमधील विविध ठिकाणी विक्री करेल.