spot_img
Home Uncategorized Latur : अखेर पिसाळलेल्या माकडांपासून गावकऱ्यांची सुटका

Latur : अखेर पिसाळलेल्या माकडांपासून गावकऱ्यांची सुटका

0
271

60 जणांना घेतला होता चावा

Indiagroundreport वार्ताहर
लातूर : जिल्‍ह्यातील सोनखेड गावात काही माकडांनी उच्‍छाद मांडला होता. काही केल्‍या ही माकडे हातात सापडत नव्‍हते. परंतु, पाच दिवसांनंतर त्या वानराला आणि अन्य पाच अश्या सहा माकडांना पकडण्यात वनविभागाला(Forest Department) यश आले आहे. त्यामुळे पाच दिवसांनंतर येथील गावकऱ्यांची त्या पिसाळलेल्या वानरांपासून सुटका झाली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून गावकरी व लातूरचे(Latur) वनविभाग त्या वानरांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवित होते, पण त्यांना काही केले तरी ते वानर सापडत नव्हते. त्यानंतर संभाजीनगर येथील वनविभागांच्या पथकाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. पथकाने पिसाळलेल्या वानरांना पकडून पिंजऱ्यात बंद केले आहे.