spot_img
Home crime-mr Solapur : धुळे राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरची मालवाहू ट्रकला जोरदार धडक

Solapur : धुळे राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरची मालवाहू ट्रकला जोरदार धडक

0
286

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : धुळे राष्ट्रीय महामार्गावर(Dhule National Highway) आज रविवारी टँकर आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, टॅंकर चालक यात जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ घडला. येथे रस्त्याच्या कडेला एक मालवाहू ट्रक उभा होता, तर सोलापूरहून औरंगाबादच्या दिशेने एक केमिकल टॅंकर(chemical tanker) जात होता. यावेळी केमिकल टॅंकरची मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली.

वैभव देशमुख असे टॅंकर चालकाचे नाव आहे. या टॅंकरमध्ये औषधी केमिकल भरलेले होते. टॅंकर पलटी झाला असता, तर आणखीन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठा अनर्थ होताहोता टळला असला, तरी टॅंकरचे यात नुकसान झाले आहे. या घटनेत दोन्ही मोठी वाहने(vehicles) असल्याने काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.