spot_img
Home International-mr Beijing : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार!

Beijing : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार!

0
291

कठोर निर्बंधाविरोधात नागरिक रस्त्यावर; ‘शी जिनपिंग’ यांना हटविण्याची मागणी

Indiagroundreport वार्ताहर
बीजिंग : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. रविवारी ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे सरकारकडून शून्य कोरोना रुग्ण धोरण राबविण्यात येत आहे. त्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधाविरोधात चीनचे नागरिक(Chinese citizens) रस्त्यावर उतरले असून, राष्ट्रपती शी जिनपिंग यांना हटविण्याची मागणी करीत आहेत.

शांघाई(Shanghai) शहरात रविवारी लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शन करीत असतानाचे चित्र दिसले. ‘शी जिंनपिग यांना हटवा,’ ‘कम्युनिस्ट पक्षाला हटवा’, ‘आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे’, अशा घोषणा नागरिक देत होते. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उरुमकीमध्ये गुरुवारी एका इमारतीला आग लागली होती. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या(Corona) पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कठोर निर्बंधामुळे ही इमारत बंद होती, त्यामुळे लोकांना वाचविण्यात अपयश आले. यानंतर चीनमधील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून निर्बंध हटविण्याबाबत सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान, रविवारी चीनमध्ये ४० हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. उरुमकीमधील(Urumqi) ४० लाख लोकांना १०० दिवस घरातून बाहेर पडण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याविरोधात शनिवारी नागरिक आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत येऊन ‘लॉकडाऊन हटवा’चे नारे देत होते.