spot_img

Pune : अभिनव अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन महाविद्यालयांनाच मिळणार मान्यता

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात पारंपारिक पद्धतीने नवीन कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांना मान्यता देण्यासंदर्भात प्रस्ताव आल्यास ते नाकारले जातील. तुम्हाला नवीन महाविद्यालय सुरू करायचे असेल, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय घेऊन शिक्षण घेता येईल, असा नवीन अभ्यासक्रम विकसित करावा लागेल. अशाच अभ्यासक्रमांचे प्रस्ताव घेऊन येणाऱ्या महाविद्यालयांना यापुढे मान्यता आणि अनुदान दिले जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले.

तसेच पुणे एज्युकेशन फोरमच्यावतीने ‘उच्च शिक्षणातले बदलते प्रवाह : संधी आणि आव्हाने’ विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. चंद्रकांत पाटील हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. नवीन महाविद्यालयांना(new colleges) मान्यता देण्यासंदर्भातील नव्याने अटी घालण्यात येतील, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

चर्चासत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, आमदार राहुल कुल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अनिरुद्ध देशपांडे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Purba Medinipur : बीएलए को जान से मारने की धमकी, तृणमूल नेताओं के खिलाफ एफआईआर

पूर्व मेदिनीपुर : (Purba Medinipur) तृणमूल कांग्रेस की एक सभा के दौरान जान से मारने की धमकी देने के आरोप में बीएलए-दो शेख मसूद...

Explore our articles