spot_img

New Delhi : भारतीय सैन्यदलाद्वारे पाच प्रकल्पांना मान्यता

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : देशात आत्मनिर्भर भारत(Atmanirbhar Bharat) या संकल्पनेअंतर्गत विविध क्षेत्रात तंत्रज्ञान, उत्पादने, प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करीत उत्पादनांच्या निर्मितीसाठी सैन्यदलाद्वारे मेक-२ श्रेणीतील पाच प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर वाटचालीकडे एक मोठा पाऊल पडला आहे.

मेक-२ प्रकल्पाअंतर्गत उत्पादनाच्या विकासासाठी भारतीय उद्योगांच्या माध्यमातून डिझाईन, विकास आणि नावीन्यपूर्ण उपायांचा त्यात समावेश आहे. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग(एमएसएमई), स्टार्टअपला(startups) संधी मिळत आहे.

दरम्यान, उत्पादनाच्या विकासानंतर यशस्वी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अपेक्षित संख्येमध्ये त्या उत्पादनाची मागणी नोंदविण्यात येते. सैन्यदलाद्वारे मान्यता मिळालेल्या प्रकल्पांमध्ये हाय फ्रिक्वेंसी मॅन पॅक्ड सॉफ्टवेअर डिझाईन रेडिओ (एचएफएसडीआर), ड्रोनला विरोधी यंत्रणा, इन्फंट्री ट्रेनिंग वेपन सिम्युलेटर (आयडब्ल्यूटीएस), मध्यम पल्ल्याची अचूक मारा करणारी प्रणाली (एमआरपीकेएस) आणि १५५ एमएम टर्मिनली गाइडेड म्युनिशन(टीजीएम) यांचा समावेश आहे.

Purba Medinipur : बीएलए को जान से मारने की धमकी, तृणमूल नेताओं के खिलाफ एफआईआर

पूर्व मेदिनीपुर : (Purba Medinipur) तृणमूल कांग्रेस की एक सभा के दौरान जान से मारने की धमकी देने के आरोप में बीएलए-दो शेख मसूद...

Explore our articles