
टांझानियात : टांझानियात(Tanzania) रविवारी विमान तलावात कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात ४९ प्रवाशी होते. या दुर्घटनेतील २३ प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांचे बचावकार्य सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टांझानियातील विक्टोरिया तलावात(Lake Victoria) विमान कोसळण्याची दुर्घटना घडली. या विमान दुर्घटनेत ४९ विमान प्रवाशी प्रवास करीत होते. या दुर्घटनेतील २३ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
टांझनियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४९ प्रवाशांचे विमान हे खराब हवामानामुळे दुर्घटनाग्रस्त झाले असून, सदर विमान थेट व्हिक्टोरिया तलावात कोसळले(crashed). हे दुर्घटनाग्रस्त विमान हे उत्तर पश्चिम येथील बुकोबा शहरात लँड होणार होते. याचदरम्यान विमान दुर्घटनेची घटना घडली. या दुर्घटनेतील प्रवाशांचे जीव वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.


