spot_img

Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पायाभूत सुविधांचे काम

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेंट्रल रेल्वे(Central Railway) दि. ६ नोव्हेंबर २०२२ पासून दोन महिन्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १०/११ आणि १२/१३ च्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा ब्लॉक परिचालीत करणार आहे. या ब्लॉकमुळे पुढीलप्रमाणे ट्रेन चालतील.

ट्रेन क्र. 02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड(Manmad-Mumbai-Manmad) स्पेशल दि. ६ नोव्हेंबर २०२२ पासून गुरुवार वगळता आठवड्यातून ६ दिवस दादर येथे शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट होईल.

प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा, अशी विनंती रेल्वेकडून करण्यात आली आहे.

Explore our articles