spot_img

New Delhi : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi)
स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी(Shyam Saran Negi) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते १०६ वर्षांचे होते. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. त्यांनी आपल्या आयुष्यात ३३ वेळा मतदानाचा हक्क बजावला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी नुकतेच शेवटचे पोस्टल मतदान केले.

श्याम सरण नेगी यांचा जन्म १ जुलै १९१७ रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आताच्या कल्पा(Kalpa) या गावात झाला. त्यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले, परंतु वृद्धापकाळामुळे त्यांना दहावीला प्रवेश मिळाला नाही. श्याम सरण नेगी हे कल्पा येथील शाळेत शिक्षक होते. त्यांनी सुरुवातीला १९४० ते १९४६ या काळात वनविभागात वनरक्षक म्हणून काम केले.

देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक(general election) १९५१ साली पार पडली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हा श्याम सरण नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला सहभाग नोंदविला.

मला माझ्या मताचे महत्त्व माहीत आहे, असे श्याम सरण नेगी सांगायचे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे, त्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबरला शेवटचे पोस्टल मतदान केले आहे.

New Delhi: Shyam Saran Negi, the first voter of independent India, passed away

‘शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचे आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते,’ अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले.

Explore our articles