spot_img

Mumbai : 28 नोव्हेंबर रोजी ‘त्या’ 442 पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची होणार निश्चिती

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम वेगात
दीपक पवार
मुंबई : (Mumbai)
म्हाडाच्या(MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नायगाव बीडीडी चाळीतील १२ बी, १३ बी, १४ बी, १५ बी, १६ बी, १९ बी व २२ बी या इमारतींमधील ४४२ पात्र गाळेधारकांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्विकास इमारतीमध्ये यादृच्छिक पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे सदनिकांचा क्रमांक निश्चितीचा कार्यक्रम सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Mumbai: On November 28, the flats of 'those' 442 eligible owners will be determined

सदर कार्यक्रम वांद्रे(पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात होणार आहे. सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीच्या(committee) उपस्थितीमध्ये पात्र गाळेधारकांकरिता सदनिका क्रमांक निश्चिती करण्यात येणार आहे. या सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संबंधित चाळींमधील उपरोक्त नमूद इमारतींतील प्रथम येणाऱ्या ५ सदस्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या गाळेधारकांनी संबंधित चाळीमधील गाळेधारक असल्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Wellington : न्यूजीलैंड क्रिकेट को मिला नया CEO, ज्योफ अलॉट संभालेंगे कमान

वेलिंगटन : (Wellington) न्यूजीलैंड क्रिकेट ने पूर्व अंतरराष्ट्रीय तेज गेंदबाज ज्योफ अलॉट (international fast bowler Geoff Allott) को अपना नया मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त...

Explore our articles