spot_img

Madhya Pradesh : पदयात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधींनी चालविली बाईक

Indiagroundreport वार्ताहर
भोपाळ : मध्य प्रदेशातील ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रवासाची सुरुवात रविवारी मोठ्या उत्साहात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी(Rahul Gandhi) बाईक चालविण्याचा आनंद लुटला. गेल्या काही वर्षात एकामागोमाग झालेल्या पराभवानंतर जनतेशी जनसंपर्क वाढविण्यासाठी काढण्यात आलेली कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ही ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास करीत आहे.

या व्हिडिओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक(bike) चालविताना दिसत आहेत. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.

पदयात्रेदरम्यान निवांतक्षणी फुटबॉल खेळतानाचा राहुल गांधींचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. आदिवासींसोबत नृत्याचा आनंदही लुटताना ते दिसले होते.

मध्य प्रदेशातील या पदयात्रेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीदेखील(Priyanka Gandhi) सहभागी झाल्या आहेत. आगामी २०२४ मधील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या पदयात्रेद्वारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पदयात्रेदरम्यान काहींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात(Gujarat) निवडणूक प्रचारात सक्रीय नसल्याची टीका होत असतानाच पदयात्रा सुरू ठेवण्यावर राहुल गांधी भर देताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्याच आठवड्यात त्यांनी एका सभेला संबोधित केले होते.

Explore our articles