spot_img

Mumbai : खंडणी मागणाऱ्या दोघांना माटुंगा पोलिसांकडून अटक

मुंबई : मुंबई – माटुंगा पूर्वेकडील किंगज सर्कल येथील एका डॉक्टरला खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नोबिन मोहंमद शेख आणि कुणाल सिंग अशी त्यांची नावे आहेत. यातील शेख हा खार भागात तर कुणाल हा चेंबूर कॅम्प येथे राहण्यास आहे. या भागात एकडचतरच्या दवाखान्याचे काम सुरू होते. त्यावेळी हे दोघे इसम तेथे आले. त्यांनी काम करणाऱ्या कामगारांना आपण संतोष पाटील यांची माणसे आहोत. आम्ही माथाडी मंडळाकडून आलो असून, मथाडीची पावती फाडण्यासाठी तंबी देऊ लागले. पावती फाडली नाही तर काम बंद करण्याची धमकीही देऊ लागले. त्यावेळी कामगारांनी सबंधित डॉक्टरला फोन लावून जी माहिती दिली. यावेळी या दोन्ही आरोपींचे बोलणेही करून दिले. त्यावेळीही त्यांनी आपण संतोष पाटील यांची माणसे असल्याचे सांगत पावती फाडली. त्यानंतर पावतीची रक्कम गुगल पेवर पाठवण्याचे सांगितले. मात्र डॉक्टरने त्यांना पैसे न देता थेट माटुंगा पोलीस ठाणे गाठले. तेथे या दोघांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) केशव वाघ तसेच अधिकारी दिगंबर पगार, विनोद पाटील , जयेंद्र सुर्वे आणि कर्मचारी पवार किशोर देशमाने, नथूलाल चव्हाण, मंगेश जऱ्हाड, निकम , साळुंखे आदींनी तांत्रिक तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ प्रवीण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या दोन्ही आरोपींवर माटुंगा पूर्व परिसरातील आणखी एका डॉक्टरकडून ४० लाखांची खंडणी घेतल्याचे तपसात उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

New Delhi : पश्चिमी एशिया में जारी तनाव के बीच एलपीजी सिलेंडर महंगा, घरेलू सिलेंडर पर 60 और वाणिज्यिक 114.5 रुपये बढ़े

नई दिल्ली : (New Delhi) पश्चिम एशिया में जारी सैन्य तनाव (military tensions in West Asia) और होर्मुज जलडमरूमध्य के रास्ते आयात होने वाली...

Explore our articles