
चैत्यभूमी ट्रस्ट व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हि सज्ज
मुंबई : (Mumbai) भारतीय घटनेचे व आधुनिक भारताचे शिल्पकार बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यासाठी देशातून लाखी आंबेडकरी अनुयायी मुंबई मध्ये दाखल होऊ लागले आहेत.राज्य सरकार आणि मुंबई पोलीस यांनी लोकांचा सुरक्षाचि तर पालिकेने सोई सुविधा यांची काळजी घेतली आहे. तरीहि समता सैनिक दलाने ५ हजार सैनिकांचि सुरक्षा तयनात केली असून ट्रस्टी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थानि सर्व नियोजन केले आहे.
दादरचा चैत्यभूमीवर १दिसेम्बर् पासून देशभरतुन् लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात.५ डिसेंबर पासून अभिवादन करण्यासाठी अनुयायी रांग लावतात.अनुयायांना रांगेतून शिस्तीने , व्यवस्थित जाता यावे तसेंच चैत्यभूमीवर येणारे लाखो आंबेडकरी अनुयायी आणि विशेष मान्यवर्, आणि संगीत संच,जाहीर सभा, आणि विविध स्टोल, ट्राफिक यासाठी मुंबई पोलीस,सरकार आणि पालिका चोख असतो तरी हि आमचा माध्यमातून् आम्ही हि पूरक नियोजन करत असतो. असे चैत्यभूमी ट्रस्ट,भारतीय बौध्द महासभा आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सांगितले.
लोकांचा सुरक्षा आणि सोई सुविधा साठी भारतीय बौद्ध महासभेचे ३ हजार व्यवस्थापक व स्वयंसेवक आणि समता सैनिक दलाचे २ हजार अधिकारी व सैनिक सेवा देणार आहेत्. चैत्यभूमी ट्रस्टीची महापरिनिर्वाण दिनाची व्यवस्था चैत्यभूमी ते वरळी, शिवाजी पार्क , दादर रेल्वे स्टेशन , डॉ आंबेडकर भवन आणि डॉ बाबासाहेब यांचे निवासस्थान – राजगृह या ठिकाणी सेवा दिली जाणार असून त्यासाठी या संपूर्ण परिसराचे १४ विभाग करण्यात आले आहेत. असे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले.
भीमराव आंबेडकर यांचा देखरेख अंतर्गत व्यवस्था
व्यवस्थापक समितीचे प्रमुख भीमराव य आंबेडकर असून व्यवस्थेसाठी भारतीय बौध्द महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय पदाधिकारी सहप्रमुख व उपपमुख , केंद्रीय विभागाचे पदाधिकारी व मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी , सहाय्यक उपपमुख ,विभाग अधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी ,केंद्रीय शिक्षक व बौद्धांचार्य, व्यवस्थापक व वॉर्ड ,तालुका व शहर शाखाचे पदाधिकारी व सभासद कार्यकर्ते यांना स्वयंसेवक म्हणून सेवेची १२-१२ तासांची ड्युटी देण्यात आलेली आहे.या वेळी सर्व ड्युटी बॅच वर फोटो आवश्यक केला असून फोटो नसल्यास बॅच रद्द असे त्या ड्युटी बॅच वर नमूद केलेले आहे.
अँड प्रकाश तथा बाळासाहेब आदरांजली सभा
५ दिसेम्बर रात्री १२ वाजता चैत्यभूमी ट्रस्टी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण परिवार यांच्या उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना,आदरांजली आणि वंदना सुत्रपठन होईल. तसेंच सकाळी समता सैनिक दलाची जनरल सलामी आणि संचलन होईल. तसेंच सायं.६ वा संस्थेचे सल्लागार अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय बौद्ध महासभेची आदरांजली सभा होईल.


