
मुंबई : पब्लिक रिलेशन्स कोंसिल ऑफ इंडिया (PRCI), या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या चॅप्टरच्या अध्यक्षपदी बेंझ हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ.एस.एच.जाफरी यांची, सचिवपदी नवभारत समुहाचे उपाध्यक्ष हेमंत कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
या नवीन कार्यकारिणीत खासगी आणि शासकीय संस्था, माध्यमे आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे, ज्यात उपाध्यक्षपदी राजीव बॅनर्जी, (एसव्हीपी कार्पोरेशन, पिरामल ग्रुप), पराग दांडेकर, (महाव्यवस्थापक, सांघिक संवाद आणि जनसंपर्क, राष्ट्रीय केमिकल्स ऍन्ड फ़र्टीलायझर), डॉ.सूर्यकांत मिश्रा, (सीसीडी तवगा प्रमुख) यांची सहसचिवपदी शामली गुप्ता, माध्यम सल्लागारपदी योगेश विटणकर (उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण), प्रसिध्दी प्रमुखपदी प्रीतम शर्मा, कोषाध्यक्षपदी स्वाती म्हात्रे, (जनसंपर्क अधिकारी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल), सेलिब्रिटी समन्वयकपदी डॉ. रेखा गौर तर प्रकाशने प्रमुखपदी स्नेहा मावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पीआरसीआय हे भारतातील प्रमुख कम्युनिकेशन एक्सचेंज फोरम आहे. भारतातील 38 प्रमुख शहरांतील जनसंपर्क, माध्यमे, वाणिज्यिक आणि शासकिय सेवा, जाहीरात, विपणन आणि जनसंवाद विषयातील विद्यार्थ्यांना एकत्रित जोडायचे कार्य पीआरसीआय सातत्त्याने करीत आले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे जनसंपर्क क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, जनसंपर्काबाबत समाजाचा दृष्टीकोन, जनसंपर्काच्या माध्यमातून जनसेवा, या क्षेत्रातील रोजगाराच्य संधी, नवीन व होतकरू व्यावसायिकांना जनसंपर्काचे बारकावे सहजपणे कळावेत यासाठी पब्लिक रिलेशन्स कोंसिल ऑफ इंडिया कटीबद्ध असल्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष डॉ.एस.एच.जाफरी यांनी दिली आहे.

