Home Uncategorized Mumbai : भोंगे दिसतील तिथे ट्रकमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा लावा : राज...

Mumbai : भोंगे दिसतील तिथे ट्रकमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा लावा : राज ठाकरे

0
221

राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पुन्हा आदेश

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा समोर आणला आहे. जिथे मशिदींवर भोंगे दिसतील तिथे पुन्हा एकदा मोठ्या ट्रकमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले.

बाळासाहेब(Balasaheb) जी भूमिका बोलत होते, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत, ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण मशिदींवरील भोंगे काढा असे नाही म्हणालो, तर हनुमान चालिसा लावू असे सांगितले. पण, अजून काही जणांची चरबी जिरलेली नाही, त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

जिथे जिथे मशिदींवर भोंगे सुरु असतील तिथे आधी स्थानिक पोलिसांना तक्रार दाखल करा. त्यानंतरही काही झाले नाही, तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर(speaker) लावून हनुमान चालिसा लावा. मला माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडून ही अपेक्षा आहे, तेच हे करु शकतात, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.