spot_img

Pune : रिक्षा संघटना 28 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर

Indiagroundreport वार्ताहर
pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे उद्यापासून( 28 नोव्हेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेने पुकारलेल्या बेमुदत बंदला इतर १२ ऑटोरिक्षा संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक-टॅक्सीमुळे रिक्षावाल्याचा ९० % व्यवसाय बुडत असल्याचा दावा रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक-टॅक्सीच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. आम्ही ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक-टॅक्सी बंद झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेने दिला आहे.

Explore our articles