
17 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
Indiagroundreport वार्ताहर
धुळे : (Dhule) काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ट्रॅव्हल बसला आग लागल्याच्या घटनेदरम्यान मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी ट्रॅव्हल बसमधून गुंगीकारक पदार्थांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा उघडकीस आणला होता. त्यानंतर धुळ्यात(Dhule) खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
खाजगी ट्रॅव्हल बसमधून अवैधपणे गुटखा पान मसाला त्याचबरोबर नशेच्या वस्तूंची वाहतूक केली जात असल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड(Chalisgaon Road) परिसरामध्ये खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता त्या दरम्यान संबंधित माहिती मिळालेली ट्रॅव्हल्स पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना तपासादरम्यान आढळून आला. या कारवाईदरम्यान जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, ट्रॅव्हल्स चालक(driver) व वाहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


