spot_img
Home Uncategorized Mumbai : गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले? : अंजली दमानिया

Mumbai : गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले? : अंजली दमानिया

0
213

चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित; चौकशीची मागणी

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania) यांनी ट्वीट करीत गुवाहाटी दौऱ्याबाबत सवाल उपस्थित केला आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी चार्टर्ड विमानांचा वापर केला असावा, तसेच त्यांनी गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रॅडिसनमध्ये राहण्याची व्यवस्था केली असावी. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाकडे इतके पैसे कुठून आले?, याचा तपास केला जावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील आमदारांसह त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास १८० जण कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याची माहिती मिळत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.