spot_img

Mumbai : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असताना वीजबिलाबाबत वेगळी भूमिका घेतली, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले आहे.

शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्यावरुन शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ आणि महावितरणचं वीजबिल वसुलीबाबतचं पत्र ट्विटरवर शेअर केले. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, काहींना जनाची नाही आणि मनाचीही लाज वाटत नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय आहे.

यावर जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही(doesn’t chat in the air). महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वत्तोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे देंवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

वीजबिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबविण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाजी लाज बाळगा, असे उद्धव ठाकरे आज झालेल्या चिखली येथील जाहीरसभेत म्हणाले. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्‍यांचं वीज बील(electricity bill) माफ करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केले.

Explore our articles