
28 नोव्हेंबर रोजी होणार नार्को चाचणी
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर मर्डर केसमधील आरोपी आफताब अमीन पूनावालाची पोलीस कोठडी संपली. यानंतर त्याला शनिवारी(२६ नोव्हेंबर २०२२) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने(The court) आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आफताबला आज दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच 28 नोव्हेंबरला आफताबची नार्को चाचणी होणार आहे.
आफताब अमीन पूनावाला यास शनिवारी सकाळी १० वाजता दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचे मेडिकल झाले. दरम्यान, त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी(Delhi Police) यापूर्वी सांगितले होते की, पीडितेच्या मृतदेहाचा डीएनए चाचणी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुडा यांनी सांगितले की, डीएनए चाचणीचा अहवाल(पीडित व्यक्तीच्या शरीराचा) अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.
श्रद्धा हत्याकांडात(Shraddha murder case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलीस श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास करीत आहेत, ज्यामध्ये तिचा तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताबने गळा दाबून खून केला होता, ज्याने कथितपणे तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि राजधानीच्या छतरपूर परिसरात फेकले. दिल्ली पोलिसांनी 16 नोव्हेंबर रोजी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा डीएनए नमुना घेतला आहे, जेणेकरून फेकून दिलेल्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने जुळता येतील.
दिल्ली पोलिसांनीही तपासादरम्यान आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या दिल्लीतील छतरपूर येथील फ्लॅटच्या स्वयंपाकघरात खुनाच्या खुणा सापडल्याची पुष्टी केली आहे. खून कोणी केला याचा शोध घेण्यासाठी हत्येचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आफताबने 18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या केली.


