spot_img

Mumbai : ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ

प्रशांत बारसिंग
मुंबई : अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना(teaching and non-teaching staff) विविध सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय अनुदानित कला संस्था आहेत. या कला संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विविध लाभ ५ ऑक्टोबर, २०१७ पासून लागू करण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.

हे लाभ पुढीलप्रमाणे राहतील-

अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ मधील सर्वसाधारण तरतुदी (भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांसह) लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय/त्रिस्तरीय वेतन संरचना लागू करणे, अध्यापकांनी विनाअनुदानित कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुति रजा मंजूर करणे, “कॅन्सर”, “पक्षाघात” झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करणे, अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांना(families) अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय करणे.

varanasi : पांच सरकारी और दो निजी क्रूज दे रहे सेवा

विधान परिषद में सपा सदस्य के सवाल पर मंत्री ने दिया जवाब वाराणसी : (varanasi) उत्तर प्रदेश विधान परिषद की कार्यवाही के दौरान...

Explore our articles