spot_img

Thane : ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे पोलीसदलात कार्यरत असलेले पोलीस बीट मार्शल घनश्याम गायकवाड यांचे ४ डिसेंबर रोजी लग्न होणार होते, मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा रस्ता अपघात झाला आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागला. सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात(Naupada police station) मृत पोलीस कर्मचाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मयत पोलीस बीट मार्शल घनश्याम गायकवाड (३०) हे ऐरोली, नवी मुंबई येथे एकटेच राहत होते. ते नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ड्युटीवर असताना नितीन कंपनीजवळ घनश्याम गायकवाड यांचा अपघात झाला. गायकवाड हे सांगली(Sangli) जिल्ह्यातील आटपाटी गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. मृत पोलीस बीट मार्शल घनश्याम गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. या आकस्मिक मृत्यूमुळे ठाणे पोलिसांनाही दु:ख झाले आहे. घनश्याम गायकवाड यांचे कुटुंब मूळगावी सांगली येथे राहतात. घनश्याम गायकवाड यांचे लग्न ४ डिसेंबरला होणार होते.

New Delhi : सब्सक्रिप्शन के लिए खुला इनोविजन का आईपीओ

नई दिल्ली : (New Delhi) टोल मैनेजमेंट और मैनपावर सर्विस देने वाली कंपनी इनोविजन का 322.84 करोड़ रुपये का आईपीओ आज सब्सक्रिप्शन के लिए...

Explore our articles