spot_img

Mumbai : रहिवाशांना विश्वासात घेऊनच धारावी प्रकल्प करणार पूर्ण : खा. राहुल शेवाळे

दीपक पवार
मुंबई : आपल्या मागण्यांसाठी धारावीकरांना निषेध-आंदोलने करण्याची गरज नाही, धारावी प्रकल्पासाठी मी स्वत: पुढाकार घेतला आहे. विश्वासात घेऊन तुम्हाला अभिप्रित असेल असा धारावी प्रकल्प(Dharavi project) पूर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार राहुल शेवाळे यांनी जाहीरसभेत दिली.

डीआरपी सेक्टर-१ रहिवाशी संघाच्यावतीने रहिवाशांना धारावी प्रकल्पाबाबत मागदर्शनपर जाहीरसभा नुकतीच माहीम(पूर्व) येथील शाहूनगर मैदानात संपन्न झाली. या सभेला धारावीकरांनी फार मोठी उपस्थिती नोंदविली.

यावेळी राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी म्हटले की, धारावीकरांची ४०० चौ. फुटांच्या घरांची मागणी होती. या मागणीचे नेतृत्व आम्ही सुध्दा केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीत येऊन शब्द सुध्दा दिला. यासाठी तज्ञांचा अभिप्राय सुद्धा घेतला, परंतु धारावी पॅनल झोनमध्ये असल्याने इमारतींना उंचीची मर्यादा आड आल्याने ७० : ३० चा फार्मूला बसत नसल्याने यातून मार्ग काढीत ३३(१०) ए नुसार झोपडीधारकांना ३५० चौ. फुटांचे घर देण्याचा जीआर काढला. तसेच, धारावीतील ७० टक्के जमीन ही पालिकेची आहे, त्यामुळे विनिनि ३३(९)मध्ये हा प्रकल्प होत नसल्याने चाळी आणि इमारतींना ३३(९) ए नियम लावण्यात आला आहे.

ज्यावेळी देवेन्द्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना मी सांगितले की, धारावी प्रकल्प होण्यासाठी सेक्टर-१ हा सोपा आणि रहिवाश्यांचे सहकार्य असल्याने कोणतीच अडचण नसल्याने तात्काळ याठिकाणी प्रकल्प सुरु होऊ शकतो. यावर देवेन्द्र फडणवीस म्हणाले की, आणखी काही अडचणी आहेत का?, तर, मी सांगितले, याठिकाणी अडचण हीच आहे की, रहिवाशांना किती चौ. फुटांचे घर मिळेल यावर विरोध असेल, तर त्यांचा विरोध दूर करण्यासाठी त्यांची मागणी मान्य करून सेक्टर-१ ला सुरुवात करू शकतो. सेक्टर-१ रहिवाशी संघाचे प्रतिनिधी आणि आर्किटेक मुकेश बहादूर यांनी सोबत बसून रहिवाशांना अभिप्रित असलेला प्रकल्प आराखडा तयार केला आहे.

आता मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे यांना या गोष्टीचा उल्लेख केला आहे की, जोपर्यंत लोकांना विश्वासात घेत त्यांना अभिप्रित असलेले प्रकल्प होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी पूर्णत: लोकांच्या पाठिशी उभा राहीन आणि लोकांना जसा प्रकल्प हवा तसे काम याठिकाणी करणार.

धारावी टेंडरला सेक्टर-१ मधील रहिवाशांचा विरोध आहे, परंतु हे टेंडर फायनान्शियल आणि पीएमसी नियुक्तीचे आहे. या प्रकल्पासाठी नवीन कंपनी बनविली जाईल. या कंपनीचे संचालक ठरविणार की, रहिवाशांना किती फुटाचे घर मिळणार. ही कंपनी धारावी प्रकल्पाचा मास्टरप्लॅन तयार करेल. यात रहिवाशांचे प्रतिनिधी असतील, ते सांगतील तसाच प्लॅन बनविणार. हा मास्टरप्लॅन बनल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरु होणार, असेही राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.

या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधी, तसेच धारावीतील सामाजिक संस्था, धारावी कार्यकर्त्ये यांना सोबत घेऊन एक समिती बनवावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी केली आहे, त्यांनी यास मान्यता दिली आहे, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

माटुंगा रोड रेल्वे स्टेशनलगतची रेल्वेची ४५ एक्कर जागा धारावी प्रकल्पाला मिळाली आहे, त्या ठिकाणी संपूर्ण सेक्टर उभारणार आहे. कुणालाही संक्रमण शिबिरात पाठवायचे नाही. रहिवाशांना थेट हक्काच्या घरांची चावी देणार, धारावीत जी+२ च्या घरांसाठी भाडेतत्वावरील घरांची योजना राबविण्यात येणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

आम्ही धारावीकरांसोबत

धारावीकरांना सोबत घेऊनच धारावी प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोबत बैठक घेऊन त्यांना विनंती करू, रहिवाशांनी आंदोलने करू नये, हे सरकार जनतेचे आहे, कुणावरही अन्याय करणार नसल्याचे सांगत आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी दिली.

Ranchi : आईईडी विस्फोट में घायल सहायक कमांडेंट सहित दो जवान हेलीकॉप्टर से लाए गए रांची

रांची : (Ranchi) झारखंड के पश्चिमी सिंहभूम जिले (Jharkhand's West Singhbhum district) के घने सारंडा जंगल में रविवार तड़के सुरक्षाबलों और प्रतिबंधित माओवादी संगठन...

Explore our articles