spot_img

Mumbai : सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : अब्दुल सत्तारांविरोधात 2 तक्रारी दाखल

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मुंबईत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले. मुंबईत अब्दुल सत्तारांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर अब्दुल सत्तार हे बॅकफूटवर गेले असले, तरी राष्ट्रवादी आक्रमकच आहे.

पहिली तक्रार बोरीवली पोलीस ठाण्यात(Borivali Police Station) दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष ॲड. इंद्रपाल सिंग यांनी अब्दुल सत्तारांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

दुसरी तक्रार रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये(Ramabai Ambedkar Marg Police Station) दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही तक्रार पोलिसांत दिली आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांना महेश तपासे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. कृषिमंत्री यांना सत्तेचा माज आला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीने(NCP) दिलेल्या २४ तासांच्या अल्टिमेटमबाबत अब्दुल सत्तार म्हणाले की, कुणीही अल्टिमेटम वैगेरे देऊ नका, मी अल्टिमेटमला घाबरत नाही. मी महिलांबाबत काहीही बोललो नाही. कुणीही माझ्या घराच्या काचा वैगेरे फोडू नका, मी कुणालाही घाबरत नाही.

Washington/Tehran : ईरान पर समझौते का कोई दबाव नहींः ट्रंप

वाशिंगटन/तेहरान : (Washington/Tehran) अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप (U.S. President Donald Trump) ने सोमवार को कहा कि ईरान पर बुधवार को इस्लामाबाद में दूसरे...

Explore our articles