
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत एक मगरीचे पिल्लू सापडले असून, त्याला प्राणी मित्रांनी आणि पोलिसांनी ताब्यात घेत त्याची वैद्यकीय चाचणी करून इतरत्र सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हे मगरीचे पिल्लू भारतीय मार्श मगर म्हणून ओळखले जाते. याची लांबी सुमारे ३ फूट ३ इंच इतकी असून, त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर पशुवैद्यकाने त्याला जंगलात सोडण्यासाठी योग्य असल्याचे घोषित केले. त्यानंतर त्याला पाणस्थळी सोडण्यात आले. यावेळी पोलीस आणि वान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


