spot_img

Mumbai: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मोठ्या मुलाला सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा मुलगा सलील देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून आज जामीन मंजूर करण्यात आला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सलील आरोपी असल्याचं म्हटलं होतं. आज सलील देशमुख कोर्टात हजर झाल्यानंतर समन्स रद्द करत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 88 अंतर्गत सलिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सलीलला 3 लाखांच्या रोख हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सलील हे 17 व्या क्रमांकाचे आरोपी आहेत. सलील देशमुख यांच्या वतीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये वकील इंद्रपाल सिंग आणि वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. सलील देशमुख यांनी आतापर्यंत तपासात सहकार्य केले आहे. यापुढे ही सहकार्य करणार ,अस आश्वासन कोर्टाला दिल आहे. त्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी सलील देशमुख यांना काही अटी आणि शर्तीच्या आधारे जामीन मंजूर केला.

अटी आणि शर्ती अशा आहेत.
सलील देशमुख यांना पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश आहेत.देशाबाहेर कुठेही जाता येणार नाही,पासातील संबंधित कुठल्याही व्यक्तीला तथा साक्षीदारावर दबा न आणण्याचे निर्देश,तपास यंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश।

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Explore our articles