Nandurbar : दोन वाहनांच्‍या धडकेत 15 जण जखमी

0
150

Indiagroundreport वार्ताहर
नवापूर : सूरतहून साखरपुडा आटोपून मालेगावला जात असताना रात्री अकराच्या सुमारास अपघात(Accident) झाला. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्‍याने यात १५ प्रवाशी जखमी झालेत. यात दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(१३ नोव्‍हेंबर) रात्री अकरा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील प्रतापपूर गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात मालेगावच्‍या दिशेने जात असलेल्‍या क्रुझर वाहनातील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णवाहिका(Ambulance) जीवनधाराचे पायलट लाजरस गावित यांनी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविले. अपघात होताच दोन्ही दुर्घटनाग्रस्त वाहनांचे चालक फरार झाले.

प्रतापपूरजवळ(Pratappur) कार व क्रुझर गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १५ प्रवासी जखमी झाले. यातील दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व अपघातग्रस्त मालेगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.