Mumbai : संजय राऊत प्रकरण : 11 नोव्हेंबर रोजी ईडीच्या याचिकेवर सुनावणी

0
173

Mumbai: Sanjay Raut case: Hearing on ED petition on November 11

सुधाकर कश्यप
मुंबई : (Mumbai)
शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांना मुंबई सत्र न्यायालयाने काल जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयाचा हा आदेश रद्द करावा या मागणीसाठी ईडीने(ED) हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात उद्या(11 नोव्हेंबर रोजी) सुनावणी होणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे गेले 102 दिवस जेलमध्ये होते. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. गेल्या महिन्यात त्यांनी त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल होताच जामिनासाठी मुंबई सेशकोर्टात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर एक महिना सुनावणी झाली, त्यानंतर मुंबई सेशन कोर्टातील विशेष PMLA कोर्टाचे न्यायमूर्ती पी. डी. देशपांडे यांनी काल निकाल दिला. यात पत्राचाळ हे प्रकरण दिवाणी स्वरूपाच असून, या प्रकरणात संजय राऊत यांना बेकायदेशीर अटक झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना दोन लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यावर सत्र न्यायालयाने या निकालावर स्थगिती द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. ती मागणी सेशन कोर्टाने(session court) फेटाळून लावली. या विरोधात ईडीने तात्काळ म्हणजे काल मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून संजय राऊत यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्याची मागणी केली. मात्र, मुंबई हायकोर्टाने ही मागणी फेटाळत ईडीच्या अर्जावर सुनावणी घेऊन आदेश करण्यात येईल, असे न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सांगितले होते. त्यानुसार ईडीच्या याचिकेवर सुनावणी होणं आज अपेक्षित होत. मात्र, याचिका सुनावणीसाठी आलीच नाही, यामुळे आता ईडीच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.