Mumbai : ईशान्य मुंबईतील शिवसैनिक संजय राऊत यांच्या भेटीला

0
159

मुकुंद लांडगे
मुंबई : शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून तुरुंगात होते. जवळपास १०० दिवसांनी ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख सुरेश पाटील, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी आदी पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी संजय राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन आपला पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या सुटकेनंतर घाटकोपर वृत्तपत्रविक्रेता सेना व संघाच्यावतीने नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडण्यात आले. यावेळी वृत्तपत्रविक्रेता सेनेचे अध्यक्ष प्रकाश वाणी, उपाध्यक्ष सचिन भांगे, दीपक गवळी, प्रकाश गिलबिले, नितीन रेणुसे, चंद्रकांत हळदणकर यांच्यासह अनेक वृत्तपत्रविक्रेते(newspaper vendors) उपस्थित होते.