Mumbai : अभिनेत्री कल्याणी कुरळेचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

0
385

Indiagroundreport वार्ताहर
कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा(Kalyani Kurle-Jadhav) कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. ‘प्रेमाची भाकरी'(Prema Chi Bhakri) असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.

कल्याणी कुरळे हिने आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर(Instagram) एक पोस्ट शेअर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली, असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.