spot_img
HomeUncategorizedTHANE : विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतस्टारफिश स्पोर्टस् फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी...

THANE : विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत
स्टारफिश स्पोर्टस् फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी

ठाणे : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने श्री दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग, जिम स्वीम ॲकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरणस्पर्धा नुकत्याच विजयदुर्ग येथे पार पडल्या. या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 4 कांस्यपदकासह पहिल्या दहा स्पर्धंकांमध्ये येत चमकदार कामगिरी केली.
विजयदुर्ग येथे ही सागरी जलतरणस्पर्धा पार पडली. 3 कि.मी. स्पर्धेत सोहम साळुंखे – रौप्यपदक पटकाविले तर स्नेहा लोकरे हिने पाचवा क्रमांक मिळविला तर आयुष तावडे व सोहम पाटिल याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 कि.मी स्पर्धेत आयुषी आखाडे हिने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक पटकाविले. तर कविता शहा हिने कांस्यपदक प्राप्त केले व तृणांश गद्रे, युवराज राव, विकास निसार यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
1 कि.मी स्पर्धेत फ्रेया शहा हिने सुवर्ण, रुद्र निसार याने रौप्य तर श्रृती जांभळे हिने कांस्यपदक प्राप्त केले तर व किमया गायकवाड हिने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 500 मीटर स्पर्धेत माही जांभळे हिने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक तर ओजस मोरे याने कांस्यपदक पटकाविले. तर नक्ष निसार याने चौथा व नायरा कौशल हिने पाचवे पारितोषिक प्राप्त केले.
याच ठिकाणी झालेल्या 30 कि.मी सागरी जलतरण स्पर्धेत सोहम साळुंखे यांनी तिसरा क्रमांक प्राप्त करीत 5 तास 59 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. आयुष तावडे व स्नेहा लोकरे या जलतरणपटूने 6 वा क्रमांक प्राप्त केला. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे मार्गदर्शक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे, मनोज कांबळे, रुपेश घाग, पुजा आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, महेश राजदेरकर, उपायुक्त व क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे तरणतलाव उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर