spot_img
Home Uncategorized Kolhapur : राज्यपालांवर कारवाई नाही म्हणजे राज्यकर्ते सहमत? : संभाजीराजे

Kolhapur : राज्यपालांवर कारवाई नाही म्हणजे राज्यकर्ते सहमत? : संभाजीराजे

0
403
Kolhapur: No action against the governor means the rulers agree? : Sambhaji Raje

संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल
Indiagroundreport वार्ताहर
कोल्हापूर : (Kolhapur)
छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ त्यांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का?, असा सवाल संभाजीराजेंनी(Sambhajiraj) विचारला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. आठ दिवस उलटले, तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत. त्यातच आता माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या विधानावरून(Governor’s statement) पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या(Maharashtra) जनतेला कुणीही गृहित धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात(Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हटले होते. तसेच, शिवाजी महाराजांबरोबर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची तुलना केली होती, त्यामुळे राज्यपालांच्या या विधानाचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले.