
Indiagroundreport वार्ताहर
चिखली : देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची बुलडाण्यात जाहीरसभा पार पडली. चिखली येथील शेतकरी मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींनंतर प्रथमच शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या विदर्भात आहेत. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) टीकास्त्र सोडले.
वीजबिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न(Madhya Pradesh pattern) राबविण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधाला. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाजी लाज बाळगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्यांचे वीज बील माफ करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केले.
ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. आज नवस फेडायला गेलेत काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं, अशी स्थिती त्यांची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, संविधान दिनी(Constitution Day) काय बोलायचं हा प्रश्न आहे. मात्र, संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. पुढची वाटचाल आपल्याला लोकशाही वाचविण्यासाठी करावी लागेल. हुकूमशाही आपल्याला नकोय. गद्दारी घालविण्यासाठी जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.


