Home Aurangabad-mr Aurangabad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार निश्चितपणे करेल मदत : खा. श्रीकांत...

Aurangabad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार निश्चितपणे करेल मदत : खा. श्रीकांत शिंदे

0
311

Indiagroundreport वार्ताहर
औरंगाबाद : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार निश्चितपणे मदत करेल, असा विश्वास खा. श्रीकांत शिंदे(Srikanth Shinde) यांनी व्यक्त केला. खा. श्रीकांत शिंदे सिल्लोड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिल्लोड तालुक्यातील भायगाव, अंधारी, तर फुलंब्री तालुक्यातील आळंद गाव शिवारातील शेताच्या बांधावर जावून परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री(Guardian Minister) संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरणारे, सिल्लोड तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, फुलंब्री तहसीलदार शीतल राजपूत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे आदींची उपस्थिती होती.