spot_img

Aurangabad : 96व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

Indiagroundreport वार्ताहर
औरंगाबाद : वर्धा(Wardha) येथे होणाऱ्या आगामी ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला मिळाला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांशी नाळ जोडणाऱ्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी मागणी होती. नरेंद्र चपळगावकर(Narendra Chapalgaonkar) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३ ऑक्टोबर २००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्तही आहेत.

New Delhi : पीएनबी का चौथी तिमाही का मुनाफा 14.4 फीसदी बढ़कर 5,225 करोड़ रुपये

नई दिल्ली : (New Delhi) पंजाब नेशनल बैंक (पीएनबी) (Punjab National Bank) ने वित्त वर्ष 2025-26 की (जनवरी-मार्च) चौथी तिमाही के नतीजे का ऐलान...

Explore our articles