spot_img

THANE : पोलीस असल्याचे सांगत त्रिकुटाने घातला 1.14 लाखाचा गंडा

ठाणे : कापूरबावडी परिसरातील सर्व्हिसरोडवरून जाणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाला अडवून पोलीस असल्याचे सांगितले. बोलण्यात गुंगवून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन आणि अंगठी असा १ लाख १४ हजाराचा मुद्देमाल घेऊन तोतया पोलिसांनी पोबारा केला. सदरची घटना १ डिसेंबर,२०२२ रोजी सकाळी ९-३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी गजानन बाबुराव जाधव,(67) रा. बाळकुम, ठाणे (प.) हे बाळकुम वरून कापुरबावडी कडे येणा-या सर्व्हिस रोडवर पायी चालत आले. त्यावेळी त्यांना रस्त्यात तीन तोतया पोलिसांनी थांबवून पोलीस असल्याचे सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवून १ लाख १४ हजार रुपयाची सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन तोतया पोलिसांनी पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी जाधव यांनी कापूरबवाडीत तीन तोट्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai : सुनेत्रा पवार का पहला जनता दरबार

नागरिकों की समस्याएं सुन दिए त्वरित समाधान के निर्देशमुंबई : (Mumbai) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार) की राष्ट्रीय अध्यक्षा और उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra...

Explore our articles