Thane : 18 नोव्हेंबर रोजी कळवा-मुंब्र्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद

0
185

समर प्रताप सिंग
ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे(Barvi Gravity Water Channel) तातडीने देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७:३० ते रात्री १२:०० वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेतील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपासपासून मुंब्रा फायरब्रिगेडपर्यंत(किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम. व्हॅली, अमृत नगर, अल्मास कॉलनी), तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेतमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

या शटडाऊनमुळे(shutdown) पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.