
Indiagroundreport वार्ताहर
रत्नागिरी : आरोग्य मंदिर येथील बँकेच्यासमोर तरुणीच्या नावे कर्ज प्रकरणातून शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत(Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती घुडे, गणेश शिंदे, त्यांचा मित्र आणि एक पोलीस कॉन्स्टेबल अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश विठोबा जाधव(वय ४४, रा. बौद्धवाडी, सोमेश्वर, ता. रत्नागिरी) हे गेल्या सोमवारी(दि. ७ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता शिवानी मेणे यांच्या परिवारास वडापाव घेऊन गेले होते. शिवानी मेणे यांच्या संबंधित ओळखीच्या श्रीमती घुडे या नरेश जाधव यांना ओळखतात. शिवानीने घुडे यांना काही कारणाने लग्नास नकार दिला होता. सायंकाळी जाधव शिवानीला घेऊन आरोग्य मंदिर येथील एचडीएफसी बॅंकेत आले होते. तेथे शिवानीची आर्थिक फसवणूक करणार असल्याच्या संशयावरून संशयित महिला घुडे शिवानी यांच्या मागावर होती. अन्य व्यक्तीही होते. जाधव शिवानीला घेऊन बॅंकेत गेले, तेव्हा तिची मैत्रीण आणि तिचे सहकारी बॅंकेत आले. त्यांना पाहताच पैसे न काढता शिवानी आणि जाधव बाहेर आले.
दरम्यान, कर्ज काढल्याचा गैरसमज करून काढलेली रक्कम मागण्यास चौघांनी सुरुवात केली. जाधव यांनी आपण कर्ज काढलेले नसल्याचे सांगूनही संशयितांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते, त्यावेळी एका पोलीस कॉन्स्टेबलनेही मारहाण केली.
या प्रकरणी नरेश जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात(city police station) तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अनुसूचित जातीजमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


