
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) सेंट्रल रेल्वे(Central Railway) दि. ८ नोव्हेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायाभूत सुविधांचा ब्लॉक घेत आहे, ज्यामुळे पुढील गाड्या प्रत्येकासमोर नमूद केलेल्या तारखांपासून शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजनेट केल्या जातील.
16346 तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस दि. ८ नोव्हेंबर २०२२ ते ११ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रवास सुरू होणारी ट्रेन पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट(short terminate) होईल.
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस दि. १० नोव्हेंबर २०२२ ते १३ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रवास सुरू होणारी ट्रेन पनवेल येथून शॉर्ट ओरिजनेट होईल.
12620 मंगळुरु सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस दि. ८ नोव्हेंबर २०२२ ते ११ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रवास सुरू होणारी ट्रेन पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
12619 लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस दि. १० नोव्हेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रवास सुरू होणारी ट्रेन पनवेल येथून शॉर्ट ओरिजनेट होईल.
14314 बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १२ नोव्हेंबर २०२२, १९ नोव्हेंबर २०२२, २६ नोव्हेंबर २०२२, ३ डिसेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी प्रवास सुरू होणारी ट्रेन ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
22512 कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १२ नोव्हेंबर २०२२, १९ नोव्हेंबर २०२२, २६ नोव्हेंबर २०२२, ३ डिसेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी प्रवास सुरू होणारी ट्रेन ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

22511 लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एक्स्प्रेस दि. १५ नोव्हेंबर २०२२, २२ नोव्हेंबर २०२२, २९ नोव्हेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२ आणि १३ डिसेंबर २०२२ रोजी प्रवास सुरू होणारी ट्रेन ठाणे येथून शॉर्ट ओरिजनेट होईल.
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे(infrastructure block) होणाऱ्या बदलाची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


