
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले. मुंबईत अब्दुल सत्तारांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर अब्दुल सत्तार हे बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दाबाबत खेद व्यक्त केला आहे. मी महिलांचा आदर करणारा असून, ते वक्तव्य मी फक्त खोक्यांबाबत केले होते, तरी कुणाचे मन दुखावले असेल, तर मी खेद व्यक्त करतो, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
संभाजीनगर येथे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिला भगिणींबाबत अपशब्द वापरला नाही. जे लोक आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललोय. सुप्रिया सुळेंबाबत कोणताही शब्द बोललो नाही, पण तरीही त्यांच्या महिलांची मने दुखावली असेल, तर मी खेद व्यक्त करतो, पण मी असे बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्यांबाबत बोललो. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिलांचा(women) सन्मान करतात, तसा मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे.
याबाबत पत्रकारांनी(journalists) आणखी प्रश्न विचारले असता सत्तार म्हणाले की, तुम्ही मला उचकवण्याचं काम करु नका, तुम्ही आमच्यात भांडणं लावू नका. आगीत तेल टाकण्याचं काम करु नका. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी महिलांचा आदर कारणारा कार्यकर्ता आहे.


