spot_img

Ratnagiri : ‘ती’ बस पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची मागणी

Ratnagiri : Demand to start 'Ti' bus as before

Indiagroundreport वार्ताहर
रत्नागिरी : (Ratnagiri)
रत्नागिरी-सैतवडे(Ratnagiri-Saitwade) फेरी संध्याकाळी खंडाळा येथून न सोडता ती पूर्वीप्रमाणेच रत्नागिरी बसस्थानकातून सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. अनेक वर्षांपासून रत्नागिरी बसस्थानकातून(Ratnagiri bus station) दुपारी तीन वाजता सुटणारी गाडी पूर्ववत सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. या गाडीविना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता आणि एसटीला उत्पन्नदेखील चांगले मिळत होते. मात्र, कोरोनाच्या(Corona) काळातील लॉकडाऊनमुळे ही बस बंद करण्यात आली, ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. आता या मार्गावर भारमान वाढल्यानंतर ही बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दुपारी बारा वाजता सोडली जाणारी सैतवडे एसटी सुटल्यावर या मार्गावर वाहतुकीसाठी कुठलाही पर्याय नाही, त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रत्नागिरी आगाराने(Ratnagiri Aagar) याचा विचार करून ती बस पूर्वीप्रमाणे रत्नागिरीतूनच सोडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Explore our articles