Wardha : वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशातील आरक्षण पूर्ववत करा; बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

0
157
Wardha : Abolish reservation in admission to medical education; Movement of Bahujan Samaj Party

Indiagroundreport वार्ताहर
वर्धा : (Wardha)
वैद्यकीय शिक्षणाकरिता(medical education) प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा टक्का कमी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रवेशाकरिता ओबीसी समाजाला 27 टक्के, अनुसूचित जातीला(Scheduled Castes) 13 टक्के, तर अनुसूचित जमातीला 7.5 टक्के आरक्षण देण्यात येत होते. मात्र, आता सरकारने हा टक्का कमी करून ओबीसी समाजाला 8 टक्के, अनुसूचित जातीला 6 टक्के, तर अनुसूचित जमातीला 3 टक्के केले आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

सदरचा निर्णय सरकारने परत घेत पूर्वीप्रमाणे आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीकडून(Bahujan Samaj Party) करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.