
समर प्रताप सिंग
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे कोर्टाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने(the court) मोठा दिलासा दिला आहे, अशी माहिती त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्रा ठाण्याला पत्र लिहिले आहे.
ऋता आव्हाड(Ruta Aawhad) यांनी पत्रात म्हटले आहे की, तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आरोप करू शकते. जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रार होऊ शकते. त्यासाठी अशी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्याला तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना दिले.
जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांच्याकडे सोपाविला आहे. या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऋता आव्हाड म्हणाल्या की, राजीनाम्याच्या निर्णय जनतेनी ठरविला पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे तीनवेळा आमदार राहिले आहेत. आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात जनतेने घातली आहे. ते निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती. पण आता वाटतंय की, देशात जे काही सुरू आहे, ते थांबायला हवं.