Thane : जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी जाहीर : जिल्हाधिकारी

0
147
Thane: Proforma voter list announced in the district: Collector

शंभर टक्के छायाचित्रांचा समावेश
समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, ठाणे जिल्ह्यातील मतदारांची(voters) एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण 61 लाख 34 हजार 955 झाली असून, या यादीत शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीत(list) पुरुष मतदारांची संख्या 33 लाख 28 हजार 009 इतकी असून, महिला मतदारांसाठी संख्या 28 लाख 06 हजार 093 इतकी आहे. तर, 853 इतर मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण 843 इतके आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये वाढ झाली असून, या यादीत 31 हजार 78 दिव्यांग मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे.

ही प्रारुप मतदार यादी विधानसभा मतदार संघ कार्यालय, महानगरापालिका, शासकीय कार्यालयात आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो अर्ज भरून आपले नाव दुरुस्त(correct) करून घ्यावे, असेही अशोक शिनगारे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात एकूण 6 हजार 391 मतदान केंद्रे आहेत. ही मतदान केंद्रे दिव्यांगस्नेही करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदार यादीतील तपशिलासोबत आधार क्रमांकाची जोडणी करण्याचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदारांना आधार क्रमांकाची जोडणी करण्यासाठी 6-ब अर्ज भरण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलासोबत जोडणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप, एनव्हीएसपी व व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर देखील करावा, असे आवाहन अशोक शिनगारे यांनी केले.

अशी आहेत मतदार यादीतील वैशिष्ट्ये-

  1. मतदार यादीमध्ये 100% मतदारांची छायाचित्रे आहेत.
  2. संपूर्ण राज्यात ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इतर(तृतीयपंथी) मतदार असून,
    त्यांची संख्या 853 इतकी आहे.
  3. मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत वाढ. मतदार यादीमध्ये लिंग
    गुणोत्तरामध्ये 838 वरुन 843 वाढ झाली आहे.
  4. मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणीमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये एकूण
    31,087 दिव्यांग मतदार मतदार यादीमध्ये चिन्हांकीत.
  5. ठाणे जिल्ह्यामध्ये मतदान केंद्रांचे सूसुत्रीकरण पूर्ण. जिल्ह्यामध्ये 6391 इतकी
    मतदान केंद्र अस्तित्वात आली आहेत. यापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये 6488 इतके
    मतदान केंद्रे अस्तित्वात होती.
  6. ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी – 5569.