Thane : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळ्यांच्या अनुदानात वाढ

0
192

समर प्रताप सिंग
ठाणे : जिल्ह्यात पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या विस्तार करण्यात आला असून, यामध्ये आता वैयक्तिक शेततळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेततळ्यांसाठीची अनुदान मर्यादाही आता 50 हजारावरून 75 हजार एवढी करण्यात आली आहे. या योजनेचा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी(farmers) लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतील वैयक्तिक शेतततळे अनुदानासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करू शकतील. पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे घटक राबविण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून, क्षेत्रधारणास कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक राहील. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी ‘मागेल त्याला शेततळे’, सामूहिक शेततळे अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. जास्तीत जास्त 34X34X3 मीटर व कमीत कमी 15X15X3 मीटर असे विविध 8 प्रकारच्या आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिमाणाच्या प्रमाणात कमाल रक्कम 75,000 रु. च्या मर्यादेत अनुदान देय राहणार असल्याचे दीपक कुटे(Deepak Kute) यांनी कळविले आहे.