spot_img
HomeUncategorizedSolapur : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडची शाईफेक

Solapur : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडची शाईफेक

Solapur: Sambhaji Brigade slapped at Gunaratna Sadavarte's press conference

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर
: सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्तेंवर मराठा आंदोलकांनी काळी शाई फेकली. सोलापूरात ते पत्रकार परिषद घेत होते, यावेळी मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घालत त्यांच्यावर शाईफेक केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. या घटनेचा गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली. ही काळी शाई छत्रपतींच्या(Chhatrapati) प्रतिमेवरही पडली. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का?

वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी काल उस्मानाबादमध्ये(Osmanabad) पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा त्यांना विरोध झाला होता.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर